यावल शहरात संभाजी पेठ भागात पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी; पालिकेचे दुर्लक्ष.
Monday To Monday NewsNetwork।
यावल (सुरेश पाटील)। यावल शहरात संभाजी पेठ भागात पाण्याचा व्हॉल नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी गटारीत वाहून जात आहे नागरिकांनी नगरपालिकेत याबाबत तक्रार केली परंतु पाण्याचे महत्व यावल नगरपालिकेला नसल्याने नगरपालिका दुर्लक्ष करीत असल्याने संभाजी पेठ भागात तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
संभाजी पेठ भागात मधुकर साळी यांच्या घराजवळील पाणी सोडण्याचा, बंद करण्याचा, व्हाल नादुरुस्त झाला आहे या भागात संपूर्ण यावल शहरात चार दिवसाआड पाणी पुरवठा होत असतो, पाणीपुरवठा सकाळी 4ते9वाजेपर्यंत सुरू असतो या दरम्यान पाण्याचा व्हाल लिकेज असल्यामुळे पाणी पाच तास मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात लाखो लिटर पाणी गटारीत वाहून जात आहे याकडे यावल नगरपालिकेने तक्रारीची अपेक्षा न ठेवता व्हाल दुरुस्ती करायला पाहिजे परंतु तक्रारी केल्यावर सुद्धा यावल नगरपालिकेचा गलथान कारभार असल्याने व्हाल दुरुस्ती केला जात नाही हे संभाजी पेठ भागातील व यावलकराचे दुर्भाग्य म्हणावा लागेल.मुख्याधिकारी बबन तडवी यांनी पाण्याचे महत्त्व लक्षात घेता पाण्याचा हॉल तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे.