भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

चाळण व प्रतवारी यंत्रणेच्या शेतकऱ्यांच्या प्रकल्पाला स्व.खा.हरिभाऊ जावळे चे नामकरण

Monday To Monday NewsNetwork।

यावल(प्रतिनिधी)। जीवनात पक्षीय वाद वेगळी बाब आहे मात्र समाज उपयोगी हित जोपासताना व्यक्तिगत द्वेष करता कामा नये असे मत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथील बाजार समितीच्या वतीने उभारलेल्या चाळण व प्रतवारी यंत्रणेच्या स्व.खा.हरिभाऊ जावळे नामकरण सोहळ्याप्रसंगी अध्यक्षपदावरून व्यक्त केले खासदार रक्षा खडसे, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या धान्यासाठी चाळण व प्रतवारी यंत्रणा उभारली आहे या प्रकल्पाचे माजी खासदार तथा माजी आमदार हरिभाऊ जावळे असे नामकरण करण्यात आले आहे कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते झाले याप्रसंगी पालक मंत्री पाटील बोलताना म्हणाले की, स्वर्गीय हरिभाऊ जावळे एक अजातशत्रू होते शेतकऱ्यांच्या व हितासाठी त्यांनी आपले राजकीय आयुष्य खर्च केले आहे नामदार पाटील यांनी हरिभाऊ जावळे यांचे समवेत विधानसभेत घालविलेल्या क्षणानाही उजाळा दिला स्वर्गीय जावळे शेतकऱ्यांच्या हितासाठी लढले त्यांची एक आठवण म्हणून बाजार समितीच्या वतीने उभारलेल्या या शेतकऱ्यांच्या प्रकल्पाला त्यांचे नामकरण दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले तालुक्याच्या विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्रित यावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले व्यासपीठावर भाजपाच्या खासदार रक्षाताई खडसे जिल्हाध्यक्ष राजू मामा भोळे हे असतांना त्यांनी भाजप आणि सेनेची जुनी मैत्री असल्याची आठवण करून देत वर्षभरापुर्वी आपली मैत्री तुटल्याचे सांगून राज्यात आमची तर केंद्रात तुमची सत्ता असल्याचे म्हणत तालुक्याच्या तालुक्याच्या विकासासाठी तुम्ही केंद्रातून निधी आना आम्ही राज्यातून आणतो असे म्हणून त्यांनी सभागृहाला हसवलं बाजार समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास काँग्रेस राष्ट्रवादी भाजपासह सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते मात्र या कार्यक्रमास सेना व भाजपा व्यतिरिक्त कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित नव्हते त्यामुळे हा कार्यक्रम केवळ भाजपा - सेनेचा असल्याची चर्चा कार्यक्रमाच्या ठिकाणी होती.

याप्रसंगी खासदार रक्षा खडसे आमदार राजू भोळे यांनीही मनोगत व्यक्त केले व्यासपीठावर म.सा .का. चेअरमन शरद महाजन, यावलच्या नगराध्यक्ष नौशाद तडवी, माजी नगराध्यक्ष सुरेखा कोळी, जिल्हा परिषद सदस्य सविता भालेराव, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी,हर्षल पाटील, जिल्हा बँक संचालक गणेश नेहते,तालुका अध्यक्ष उमेश फेगडे शहर अध्यक्ष निलेश डॉक्टर निलेश गडे, जगदीश कवडीवाले, निवासी नायब तहसीलदार के पवार भुसावळ उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, कडु पाटील, संतोष धोबी, पप्पू जोशी, बाजार समिती सभापती मुन्ना पाटील, उपसभापती उमेश पाटील , कांचन फालक, विलास चौधरी, उज्जैन सिंग पाटील आदींची उपस्थित होती होती कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय जावळे यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
प्रास्ताविक मुन्ना पाटील तर सूत्रसंचालन प्राध्यापक जतिन मेढे यांनी केले

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!