भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्ययावल

मनवेल येथे ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी ‘या अभियानाचा सभापती सौ.पल्लवी चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ !

यावल (सुरेश पाटील)। कोरना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजनेचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून मनवेल येथे ‘माझे कुटुंब -माझी जबाबदारी’ या अभियानास दि.१५ सप्टें.२०२० मंगळवार रोजी यावल पंचायत समिती सभापती सौ. पल्लवी पुरूजित चौधरी यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला.

मनवेल ग्रामपंचायत कार्यालयासमोर शुभारंभ करतेवेळी यावल तहसिलदार जितेंद्र कूवर, गटविकास अधिकारी निलेश पाटील,तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत बऱ्हाटे, उपसभापती दिपक पाटील,सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरुजित चौधरी , साकळी प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.स्वाती कवडीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली ५० वर्षे व त्यावरील वयोगटातील व्यक्तींचे आरोग्य तपासणी/ सर्वेक्षण करण्यास करण्यात आले.त्यावेळी अनिल पाटील,आरोग्य सेविका मालती चौधरी,आरोग्य सहाय्यक निकुंभ, आरोग्य सेविका साविता चौधरी, सलाउद्दीन शेख, ग्रामसेवक हेमंत जोशी पो.पा.विठ्ठल कोळी,आशासेविका रंजना कोळी,ज्योति मोरे,नागरिक यांचेसह सर्व आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर पहिल्या फेरीचे अभियान दि.१२ सप्टें.ते १५ सप्टें.०२० या कालावधीत राबवले जाणार असून गांवातील ५०पेक्षा अधिक वय असलेल्या घराघरातील व्यक्तींची सखोल आरोग्य सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या आरोग्य सर्वेक्षणासाठी गांवातील आशा स्वयंसेविका व नागरिक स्वयंसेवक यांचे एकूण 6 सर्वेक्षण पथक नियुक्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या पुढेही हा सर्वे 22 दिवस चालणार आहे. तरी गांवातील सर्व नागरिकांनी आपल्या घरी भेट देणाऱ्या आरोग्य सर्वेक्षण पथकांना सहकार्य करून वय५०वर्षावरील कुटुंब सदस्यांची तपासणी करून घ्यावी व आपल्या कुटुंबाचा कोरोना या साथराेगापासून बचाव करावा.असे आवाहन आरोग्य प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!