भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

किनगाव येथील अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या !

यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा : तालुक्यातील किनगाव येथिल ९ वी इयतेत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून यावल पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहीती अशी की, तालुक्यातील किनगाव येथिल १४ वर्षीय त्रिशिला अडकमोल इत्तया ९वी मध्ये शिक्षण घेत होती. आज दि.२८ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास मुलीची आई बाहेरगावी गेली असल्याने ती तिच्या वडीला सोबत घरी होती. वडील जेवण करून बाहेर गेल्यावर त्रिशिला अडकमोल हि घरात एकटीच होती. तेव्हा बऱ्याच वेळेने बाहेर दिसली नाही हे पाहुन शेजारी राहणाऱ्या तिला आवाज दिला मात्र तिने प्रतिसाद न दिल्याने घराचा दरवाजा आतुन बंद केला असल्याने ग्रामस्थांनी भिंतीवरून घरात उडी घेतली. मध्ये प्रवेश केला असता त्रिशालीने आपल्या घरातील छतास दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले.

त्रिशाली ही किनगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच शरद अडकमोल यांची मुलगी आहे. दरम्यान, गावात गेल्या १५ ते २० दिवसातील आत्महत्येची चौथी घटना असून, अद्याप या अल्पवयीन मुलीने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकते नाही. याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!