भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

ग्रामसेवक व गटविकास अधिकाऱ्यांचा गुरांचा गोठा बांधकामात गैरव्यवहार

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

यावल ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। हिंगोणे येथील पात्र लाभार्थ्यांना विनाकारण त्रास देत त्याचे गोठा बांधकामाचे अनुदान अडवून ठेवणाऱ्या ग्रामसेवक आणि गट विकास अधिकाऱ्यांच्या चौकशीची आणि कारवाईची मागणी करणारी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली आहे

यावल तालुक्यातिल हिंगोणे येथिल रहीवाशी लार्भार्थी शेख निसार शेख रशीद व सौ. शबानाबी शेख मुख्तार असुन यांचे. म.गां.रा.ग्रा.रो.ह. योजने अंतर्गत सन 2018-19 या आर्थिक वर्षात गुरांचा गोठा बांधकाम मंजूर झालेले आहे. ग्रामपंचायतच्या (म.गां.रा.ग्रा.रो.ह योजना) खात्यात गोठा बांधकाम पूर्ण झालेल्या एकूण 12 लाभार्थ्यांचे अनुदान जमा झाले होते. त्यापैकी 9 लाभार्थ्यांची रक्कम ग्रामसेवक देवानंद सोनवणे यांनी अदा केली. यामध्ये गोठा बांधकाम न केलेले लाभार्थी सुध्दा होते , असा आरोप होत होता. मात्र या दोन लाभार्थ्यांनी पैसे दिले नाही म्हणून त्यांचा गोठा बांधकाम पूर्ण असतांनासुध्दा त्यांना लाभापासून वंचीत ठेवले गेले , असे त्यांचे म्हणणे आहे त्यांना अनुदानाची रक्कम दिली नाही म्हणून आकाश तायडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे बोगस गोठा बांधकामाबाबत चौकशी करणेबद्दल तक्रार दाखल केली होती. यावल येथील गटविकास अधिकारी निलेश पाटील यांनी 28 ऑक्टोबर 2020 रोजी प्रत्यक्षस्थळी जाऊन थातुरमातुर चौकशी केली असा आरोपही आता केला जातो आहे .
सात लाभार्थ्यांनी गोठा बांधकाम केलेले नाही. सातपैकी दोन लाभार्थ्यांना गटविकास अधिकारी यांनी साधी नोटीससुध्दा दिली नाही. फेर चौकशी दरम्यान ते लाभार्थ्यांचे गोठे समोर येणारच अशी आता चर्चा आहे . बाकी राहिलेल्या लाभार्थीना सुध्दा त्यांनी गोठे बांधकामा बाबत नोटीसी दिल्या त्या नोटीसी या दोन अर्जदारांनासुध्दा दिल्या होत्या त्यानी खुलासा पण गटविकास अधिकारी यांना दिला. होता .

गटविकास अधिकारी या दोन लाभार्थांनां गोठा बांधकाम अनुदान देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यांचेकडे वारंवार जाऊन सुध्दा त्यांनी गोठा बांधकाम अनुदान दिले नाही. त्यांना या लाभार्थांकडून पैशांची अपेक्षा आहे का ? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे गट विकास अधिकारी यांनी तांत्रिक अधिकारी (नरेगा) यांना तोंडी सुचना देवून 5 ऑगस्टरोजी गोठा बांधकाम पाहणी करणेसाठी पाठविले. तांत्रिक अधिकारी (नरेगा) यांनी गोठा पाहणी केल्यानंतर शबानाबी शेख मुख्तार व शेख निसार शेख रशिद यांनी अंदाज पत्रक प्रमाणे काम केलेले आहे. असा अहवाल गटविकास अधिकारी यांना दिला .

त्यानंतरसुध्दा गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील म्हणतात, “दोन नाही एकच गोठा आहे, मी एकच गोठ्याचे अनुदान देईल”, तांत्रिक अधिकारी (नरेगा) म्हणतात दोन गोठे आहेत सर्व निर्णय गटविकास अधिकारीच घेतील तर शासकीय कार्यालयात इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती कशासाठी हा एक प्रकारचा त्यांचा हिटलरपणाच समजावा अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या दोन लाभार्थ्यांना ग्रामसेवक देवानंद सोनवणे व गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील हेतूपुरस्कर शासनाचे लाभापासून वंचित ठेवत आहेत. मानसिक त्रासही देत आहेत, त्यांची चौकशी करून त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी या दोन लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. शेख निसार शेख रशीद व सौ. शबाना बी .शेख.मुख्तार यांनी दोषींवर कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा देत तक्रारीच्या निवेदनाची एक प्रत पालकमंत्र्यांनाही दिली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!