” मंडे टू मंडे ” च्या दणक्याने परिवहन मंडळ नरमले ग्रामीण भागातील बससेवा अखेर सुरू
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
कोरपावली ता,यावल (प्रतिनिधी)। लाकडाऊनमुळे अनेक महिने राज्य परिवाहन महामंडळाची बस सेवा बंद असल्याने शहरी भागात सेवा सुरू करण्यात आली होती मात्र ग्रामीण भागात बस सेवा तात्काळ सुरू पूर्ववत सुरू कराव्यात असे वृत्त “मंडे टू मंडे“ मध्ये प्रसिध्द झाल्यानंतर परिवहन मंडळ नरमले ग्रामीण भागातील बससेवा अखेर सुरू झाल्या आहेत.
लाकडाऊनच्या काळात अनेक महिने राज्य परिवाहन महामंडळाची बस सेवा बंद होती मागील काही महिन्यांपासून शहरी मग नंतर राज्यांतर्गत आणि त्यांनतर अंतरराजिय बस सेवा रा.प. महामंडळाने सुरू केली होती पण ग्रामीण भागात मात्र ती सुरू करण्यात आली नव्हती त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर सामान्य जनता तसेच शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे अतोनात हाल होत होते तसेच आर्थिक भुदंड बसून वेळ वाया जाऊन मनस्ताप होत होता यामुळे वेळोवेळी ‘ मंडे टू मंडे ‘ ने ग्रामीण भागातील बस सेवा सुरु करण्याची मागणी केली होती आणि त्यांच्या या मागणीची दखल घेत हरिपुरा ,मोहराळा, वडरी सावखेडा, सावदा शटल या सहा ग्रामीण भागातील सेवा सुरू करण्यात आली असून ही सेवा सुरू राहणार असून यावर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो कारण हि सेवा सद्या आर्थिक नुकसान दायक असल्याने यावर विचार करण्यात येईल असे मत आगार प्रमुख श्री भालेराव यांनी व्यक्त केले, अखेर यावल आगाराची बस सेवा ग्रामीण भागात सुरू झाल्याने “ मंडे टू मंडे “ चे तालुक्यातील नागरिकांसह सर्वत्र ग्रामीण भागातील प्रवासी वर्गातून आणि सामान्य जनतेतून अभिनंदन केले जात आहे.