यावल तहसील मधील संगणकाचा परस्पर गैरवापर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। यावल तहसील कार्यालयात शासकीय लॉगीनचा गैरवापर करून पी,एम.किसान योजनेत शेतकऱ्यांचे रजिष्ट्रेशन परस्पर करून बेकायदेशीर गैरवापर केल्याचा प्रकार उघडकीस आला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, यावल तहसील कार्यालयातील संगणकमध्ये १४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर च्या दरम्यान संशयित आरोपी ललित नारायण वाघ रा. किनगाव ता. यावल याने शासकीय लॉगीन करून अनधिकृतपणे पी.एम. किसान योजनेत बेकायदेशीर ३८ शेतकऱ्यांचे परस्पर रजिष्ट्रेशन केल्याचा प्रकार उघडकीला आला . या प्रकरणी दिपक शांताराम बाविस्कर ,वय-३९ रा. यावल यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनला संशयीत आरोपी ललित वाघ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.