वाणी गल्लीतील नादुरुस्त गटार,व रस्त्याच्या तक्रारी बाबत यावल नगरपालिकेचे दुर्लक्ष.
Monday To Monday NewsNetwork।
यावल (प्रतिनिधी)। नगरपालिके पासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या वाणीगल्लीत श्रावगी सर यांच्या घरासमोरील गेल्या वर्षी बांधकाम झालेली गटार नादुरुस्त असल्याने दुर्गंधीयुक्त घाण पाण्याने वाणी गल्लीतील नागरिक हैराण झाले आहेत,नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा दुर्लक्ष होत असल्याने वाणी गल्लीत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
श्रावणी सर यांच्या घरासमोर गेल्या वर्षीच गटारीचे बांधकाम करण्यात आले होते निकृष्ट प्रतीचे बांधकाम झाल्याने गटारीतील घाण पाणी एकाच ठिकाणी साचुन असल्याने तसेच गटारीचा भाग तुटल्याने रस्त्यावरून घाण पाणी वाहत असते त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे याकडे यावल नगरपालिकेने तातडीने लक्ष केंद्रीत करून गटार दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी होत आहे.यावल शहरात अनेक ठिकाणी नव्याने बांधलेल्या गटारीचे बांधकाम मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे ठेकेदाराकडून होत नसल्याने तसेच यावल नगरपालिकेतील बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी यावल नगरपालिकेचा कर्मचारी किंवा बांधकाम अभियंता फिरुन सुद्धा बघत नाही याकडे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी आपले लक्ष केंद्रित करून रस्ते व गटारीचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करून ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी अशी मागणी यावल शहरातून होत आहे.