भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

यावल येथे तरुणीची गळफास लावून आत्महत्या !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा : येथिल फालकनगरात १९ वर्षीय तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली असून यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील फालकनगरात राहणारी पुजा भैरवलाला प्रजापती (वय-१९) ही तरूणी कुटुंबियांसह राहते. पुजाने रात्री कुटुंबियांसह जेवण करून झोपली होती मध्यरात्री घरात सर्वजण झोपलेले असतांना घराच्या छताच्या लोखंडी पाईपाला दोरी बांधून गळफास घेवून तिने आत्महत्या केली. आज सकाळी ७ वाजता वडील भैरवलाल प्रजापती उठल्यावर हा प्रकार लक्षात आला. तरुणींच्या आत्महत्या करण्याचे कारण लगेच समजू शकले नाही. भैरवलाल प्रजापती यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!