क्राईमयावल

१७ वर्षीय मुलीला फूस लावून पळविले

यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा । यावल तालुक्यातील भालशिव येथील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने रात्रीच्या वेळेला फसू लावून पळून नेल्याची घटना
घडली.

मिळालेली अधिक माहिती अशी की,यावल तालुक्यातील भालशिव येथील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी रात्री घरात कुटुंबासह झोपलेली असताना सकाळी आईला जाग आली तेव्हा मुलगी घरात दिसली नाही,तीची सर्वत्र शोधा-शोध केली असता मिळून न आल्याने मुलीच्या आईने सागर सुपडू सपकाळे रा. पिंप्री ता. यावल यांचेवर संशय आल्याने त्याचे विरोधात यावल पोलिसस्टेशनला तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील यावल पोलीस करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!