२१ वर्षीय तरुणी रात्री तीन वाजता अचानक बेपत्ता.
Monday To Monday NewsNetwork।
यावल (प्रतिनिधी)। यावल येथील शिवाजीनगर परिसरात राहणारी तरूणी अचानक घरातून निघुन गेल्याने खडबड उडाली आहे,मुलगी कुठे गेली या बाबत कुठलीही माहिती मिळत नसल्याने कुटुंबातील लोकांची चिंता वाढली आहे.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, सादर तरूणीची आई सुंनदा मधुकर वाघ , वय ४२ वर्ष हिने यावल पोलीसात ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, माझी मुलगी लक्ष्मी उर्फ गायत्री मधुकर वाघ वय २१ वर्ष राहणार शिवाजीनगर यावल ही दिनांक १० मे रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने लाईट बंद असल्याने मला जाग आली असता बघितल्यावर ती तिच्या जागेवर झोपलेली दिसून आली नाही म्हणुन आम्ही तीला प्रथम घरातील शौचालय व विविध ठीकाणी शोधाशोध केली असता ती मिळुन आली नाही. अखेर ती कुणाला काहीही एक न सांगता घरातुन निघुन गेल्याचे दिसुन आले असुन , याबाबत सुनंदा वाघ यांनी पोलीसात खबर दिल्याने लक्ष्मी उर्फ गायत्री वाघ ही २१ वर्षीय रंग सावळा, शरीर सळपातळ चेहरा गोल नाक सरळ जाड , केस काळे ,डोळे काळे तिने काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस व पिवळ्या रंगाची पँट व याच रंगाची ओढणी परिधान केली असुन याबाबत ती हरवल्याची नोंद करण्यात आली असुन सदरची मुलगीही कुणास मिळुन आल्यास किंवा दिसुन आल्यास यावल,ता, यावल, जिल्हा जळगाव,या पोलीस स्टेशनशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले असून
तरूणीच्या आईने यावल पोलीस ठाण्यात माहीती दिल्याने मुलगी हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.