यावल तालुक्यात २४ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग
फैजपूर,ता.यावल. मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील एका २४ वर्षीय विवाहित महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात फैजपूर पोलीस स्टेशनला जितेंद्र उर्फ येडा बाळू तायडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील फैजपूर परिसरातील एका गावात २४ वर्षीय विवाहित महिला आपल्या परिवारासह राहात असता ११ जुलै मंगळवार रोजी सकाळी आठ- साडेआठ वाजता ती घरात एकटीच असल्याचा फायदा घेऊन गावात राहणारा जितेंद्र उर्फ येडा बाळू तायडे हा दारूच्या नशेत येऊन महिलेच्या घरात घुसून त्याने महिलेचा हात पकडून अश्लील चाळे करत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत त्याचा विनयभंग केला.
या प्रकरणी विवाहितेने फैजपूर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जितेंद्र उर्फ येडा बाळू तायडे यांच्या विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश बऱ्हाटे