यावल तालुक्यात विद्यार्थीनीचा विनयभंग, गुन्हा दाखल
यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी शाळेत जाण्यासाठी मैत्रीणींसह बस स्थानकावर उभी असताना दीपक उर्फ आबा वसंत मराठे याने त्यांची छेडखानी करत विनयभंग केल्याने या तरूणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील साकळी येथील अल्पवयीन मुलगी यावल येथे इयत्ता नववी मध्ये शिकत असताना ती आपल्या मैत्रीणींसह साकळी बस स्थानकावर यावल ला जाण्यासाठी उभी असताना दीपक उर्फ आबा वसंत मराठे रा.साकळी, याने त्यांची छेडखानी केली.घडलेली घटना मुलींनी शिक्षक व पालकांना सांगितली असता मुलीच्या पालकांनी यावल पोलिसस्टेशनला तक्रार दिल्याने दीपक उर्फ आबा वसंत मराठे रा. साकळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.