धक्कादायक ; अत्याचाराचा गुन्हा दाखल संशयिताचा फैजपूर पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न
फैजपूर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील फैजपूर पोलिसस्टेशन मध्ये महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल होऊन अटकेत असलेल्या संशयित आरोपी रामचंद्र संघरत्न वाघोदे. रा.वडगाव, ता .रावेर, याने पोलीस लॉकअप मध्येच शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान हातावर ब्लेड मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या मुळे पोलिसवर्तुळात मोठी खळबळ उडाली.
यावल तालुक्यातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर २०१७-२०१८ ते आजपर्यत च्या काळात भुसावल येथील हॉटेल व रावेर तालुक्यातील गरबर्डी धरण येथे वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापित करत त्यातून ती तीन वेळा गर्भवती राहिली असता तिन्ही वेळा संशयित आरोपीने आयुर्वेदिक गोळ्या देऊन पीडित महिलेचा गर्भपात करविला.तरीही आरोपी तरुणाने पीडितेशी लग्न न केल्याने पीडितेने तक्रार दाखल केली होती. या बाबत गुन्हा दाखल होऊन आरोपीला अटक करण्यात आली होती.