भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

हिंगोणा येथील मजुराचा विहीरीत मातीखाली दाबुन मृत्यू

हिंगोणा, ता.यावल,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। यावल तालुक्यातील हिंगोणा येथील रहिवाशी मुबारक रमजान तडवी वय ३२ हा मजुर विहीरीवर कामासाठी गेला असता विहीरीत काम करत असतांना अंगावर माती पडल्याने मातीखाली दबुन गुदमरून मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली असुन , फैजपुर पोलीस स्टेशन ला घटनेची नोंद करण्यात आली आहे .

या संदर्भात मिळालेली माहीती कि हिंगोणा येथील मजूर विहिरीवर काम करण्यासाठी दिनांक १७ फेब्रुवारी शुक्रवार रोजी भालोद येथील शेतकरी हुना जयराम चोपडे यांच्या हिंगोणा शिवारातील गट क्रमांक ९१७ मध्ये असलेल्या शेतातील विहीरीवर रात्री गळ काढण्याच्या कामासाठी गेले असता,सुमारे १ वाजेच्या वेळेस विहीरीवर काम करीत असतांना अंगावर माती पडून मातीखाली दाबुन गुदमरून मुबारक रमजान तडवी या मजुराचा दुदैवी मृत्यु झाला आहे.

याबाबत शेतमालक हुना जयराम चोपडे यांनी दिलेल्या खबरी वरून फैजपुर पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असून , पुढील तपास फैजपुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे . मयत तडवी याच्या मृतदेहावर यावलच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ शिवदास चव्हाण यांनी शवविच्छेदन केले असुन , मरण पावलेल्या मुबारक हा गरीब कुटुंबातील असून घरातील कमावता मुलगा होता त्याच्या अशा अकस्मात जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तडवी यांच्या कुटुंबात पत्नी , तिन मुल असे कुटुंब आहेत .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!