भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

मधुकर सहकारी साखर कारखाना आवारात आढळला मोठा अजगर

हिंगोणा, ता यावल,मंडे टू मंडे, इम्रान पिंजारी । न्हावी मार्ग फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना येथे मागील पंधरा दिवसात पंधरा फूट लांबीचा अजगर सापडलेला असताना अजून मधुकर सहकारी साखर कारखान्या आवारामध्ये आणखी एक मोठा अजगर आढळला.हा अजगर कोणत्या जातीचा आहे हे अजून ओळखले गेले नाही.

सविस्तर वृत असे की रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या आवारात मोठा प्रजातीचा अजगर ईगल इमपावर सेक्युरिटी चे कर्मचारी दिपक कोळी व अतुल सपकाळे याना दिसल्याने त्यांनी त्यांचे सुपरवाईजर सुलतान पिंजारी यांना कळविले असता त्यांनी त्या अजगराला उमेश सपकाळे व दिपक कोळी व सुलतान पिंजारी या सर्पमित्रांनी त्या अजगराला सुखरूप पकडले, हा अजगर रात्री रस्ता ओलांडत असताना दिसल्याने तेथील कर्मचारी आरडा ओरड करू लागल्याने हा कोणत्या प्रजातीचा अजगर आहे एवढा लांब पंधरा फुटाचा या अजगराने रस्ता ओंडाळला असता तर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाने त्याची जीवित हानी झाली असती त्या अनुषंगाने सिक्युरिटी गार्ड व सुपरवायझर सुलतान पिंजारी यांनी पूर्व विभाग वन विभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना फोन द्वारे तात्काळ माहिती देऊन या अजगराला वन विभागा कर्मचाऱ्यांना पकडून दिले व त्यांना मोठा अजगर त्यांच्या ताब्यात देण्यात आला.

मधुकर सहकारी साखर कारखान्यात आवारामध्ये असे अन्यप्रकारचे प्राणी असतील अशी शंका वर्तवण्यात येत आहे तरी मधुकर साखर कारखान्यातील सेक्युरिटी गार्ड व सुपरवायझर व कर्मचाऱ्यांनी ड्युटी करत असताना रात्रीच्या गस्तीपथकाने पाहून काम करावे असे सुपरवायझर सुलतान पिंजारी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सांगितले परिसरामध्ये अजगर आढळल्याने एकच झुंबड उडालेली होती यावल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर वनरक्षक तुकाराम लवटे आगार रक्षक भैय्यासाहेब गायकवाड गोवर्धन डोंगरे किष्णा शेळके आदी कर्मचारी उपस्थित होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!