भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

हिंगोणा येथे विवाहित तरुणाची विहीरीत उडी घेवुन आत्महत्या

हिंगोणा, ता. यावल,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी। यावल तालुक्यातील हिंगोणा येथे विवाहित तरुणाने विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना दी. ६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी घडली .

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार राजाराम रमेश भिल्ल वय ३५ वर्ष राहणार हिंगोणा तालुका यावल या मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करणाऱ्या तरूणाने हिंगोणा गावाच्या न्हावी मारूळ रस्त्यावरील बेघर वस्ती जवळ असलेल्या ग्रामपंचायतच्या मालकीच्या विहीरीत दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान विहीरीत उडी घेवुन आपली जिवन यात्रा संपवल्याची घटना समोर आली आहे .

हिंगोणा ग्रामपंचायतच्या मालकीच्या गावात पाणीपुरवठा करणाऱ्या तिन विहीरी असुन , या सर्व विहिरीवर सुरक्षा म्हणुन लोखंडी जाळी बसवीण्यात आली नसल्याने या विहीरीत या आधी अनेक ग्रामस्थांनी आत्महत्या केल्या असुन , या गंभीर विषयाकडे ग्रामपंचायतचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने अनेक वेळा मागणी करण्यात आली असून , आता तरी या विहीरींवर लोखंडी जाळी बसविल्यास भविष्यात अशा प्रकारच्या आत्महत्या चे प्रकार होणार नाही अशी अपेक्षा ग्रामस्थांकडुन व्यक्त करण्यात येत आहे .

या घटनेची खबर गावातील पोलीस पाटील दिनेश बाविस्कर यांनी दिल्याने फैजपुर पोलीस ठाण्यात अकसमात मृत्युची नोंद करण्यात आली असुन , पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश बऱ्हाटे तपास करीत आहे . मयत तरूणावर यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले , सदरच्या तरुणाने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप स्पष्ठ झाले नाही .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!