यावल तालुक्यतील अल्पवयीन मुलाला पळविले
यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील कोरपावली येथील अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीन फूस लावून पळूवन नेल्याची धक्कादायक घटना घडली.
या बाबत मिळालेली माहिती अशी की,यावल तालुक्यातील कोरपावली येथील आमीन सिकंदर तडवी, वय-१७, रा. कोरपावली ता. यावल हा अल्पवयीन मुलगा शुक्रवार ३ जून रोजी सकाळी ९ वाजता यावल येथे शाळेत जावून येतो असे सांगून घराबाहेर पडला परंतु तो रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी यावल शहरातील शाळेत, मित्र, नातेवाईक अशा सर्व ठिकाणी शोध घेतला असता तो कुठेही मिळून न आल्याने त्याची आई आशा तडवी हिने पोलिसस्टेशला तक्रार दिल्याने यावल पोलिसस्टेशनला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.