यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवीले
यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तलुक्यातील दहीगाव येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघळकीस आला.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील यावल पासून सहा किलोमीटर अंतरावरील दहिगाव येथील सतरा वर्षाची अल्पवयीन मुलगी दहिगाव येथील तिच्या राहत्या घरी असताना रविवार दि ८ मे रोजी सकाळी सडे नऊ ते दहा वाजेच्या सुमारास कोण्यातरी अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळूवन नेले. या बाबत पोलिसस्टेशनला तक्रार दिल्याने यावल पोलिसस्टेशनला अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.