यावल तालुक्यात अल्पवयीन विद्यर्थिनींचा वयोवृद्ध व्यक्ती कडून विनयभंग
यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। अर्धनग्न असलेल्या वयोवृद्ध व्यक्तीने एका १२ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनी कडे पाहून अश्लील हातवारे करत विनयभंग केल्याची घटना यावल तालुक्यात घडली.
यावल तालुक्यातील एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थींनी शाळेतून घरी येत असताना तिच्या घराशेजारीच राहणाऱ्या एका अर्धनग्न असलेल्या वयोवृद्ध व्यक्तीने मुलीकडे पाहून अश्लील हातवारे करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून मुलीचा विनयभंग केला.
पीडित मुलीने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून वयोवृद्ध व्यक्ती विरुद्ध लैंगीक गुन्ह्या पासुन बालकांचे सरंक्षण कायदा २०१२ पॉस्को अन्वये यावल पोलिसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुनिल मोरे , महिला पोलिस कर्मचारी सारीका वाणी व पोलिस करीत आहे.