यावल तालुक्यातून अल्पवयीन तरुणीस पळविले
यावल,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील एका सोळा ते सतरा वर्ष दरम्यान वय असलेल्या अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना उघळकीस आली.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातीत एका गावातील सोळा ते सतरा वर्ष वय असलेली मुलगी शनिवार २१ जानेवारी रोजी शौचालयास जाते म्हणून सकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास आपल्या घरातुन गेली परंतु तीची बराच वेळ वाट बघून सुद्धा परत आली नाही, कुटुंबीयांनी तिचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळुन आली नाही.त्या मुळे तिच्या कुटुंबीयांनी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केल्याने अज्ञात व्याक्ती विरूद्ध अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळवुन नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.