यावल येथून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल शहरातुन आपल्या मावशीकडे रहायला आलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला कोण्या अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली.
या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की,यावल शहरातील फॉरेस्ट कॉलनीत एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या मावशी कडे राहायला आली होती. ४ जून शनिवार रोजी दुपारी ४ ते ५ वाजेच्या दरम्यान घरात एकटी होती,तिची मावशी व मावसा घरी आलेवर त्यांना मुलगी दिसली नाही त्यांनी तिचा, तिच्या मैत्रिणी व इतरत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही , कोण्या अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिस स्टेशनला तक्रार केल्याने यावल पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.