मंडळ अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या एका वाळू माफियांला अखेर अटक
यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील साकळीचे मंडळ अधिकारी सचिन जगताप हे आपल्या कर्तव्यावर असतांना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला या हल्ला प्रकरणातील एक वाळू माफिया गोपाळ प्रल्हाद साळुंके याला अखेर अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहीती अनुसार दिनांक २६ रोजी साकळीचे मंडळ अधिकारी सचिन जगताप हे आपल्या कर्तव्यावर असतांना ट्रॅक्टर मालक सुपडु रमेश साळुंके , ट्रॅक्टर वरील चालक आकाश अशोक कोळी आणी गोपाळ प्रल्हाद सोळुंके हे अवैधरित्या ट्रॅक्टरवर गौण खनिज वाळुची वाहतुक करून ट्रॅक्टर मधील वाळु खाली करत होते. याप्रसंगी त्यांना महसूलच्या पथकाने सदर ट्रॅक्टर ताब्यात घेवुन यावल कडे येत असतांना यावेळी कर्तव्यावर असलेले सचिन जगताप यांच्यावर वरील तिघांनी मिळुन मारहाण करीत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आरोपी फरार आहेत. यामुळे आरोपींना अटक करण्यात यावी यासाठी यावल तालुका तलाठी संघ व महसुल कर्मचारी यांनी रजा आंदोलन सुरू केले आहे.
या घटनेतील वाळु वाहतुकीचे ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले असुन, गुह्यातील संशयीत आरोपी गोपाळ प्रल्हाद साळुंके, वय २८ वर्ष राहणार कोळन्हावी तालुका यावल, यास दिनांक ३० जुन शुक्रवार रोजी रात्री कोळन्हावी या ठीकाणाहुन अटक करण्यात आली असुन , त्याच्या विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.