यावल तालुक्यातील तरुणीला सावदा, ओंकारेश्वर येथे फिरवत बळजबरी अत्याचार
यावल, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील एका २७ वर्षीय मुलीला सावदा, ओंकारेश्वर येथे फिरवत लॉजवर नेऊन अनेक वेळा अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या बाबत यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यावल तालुक्यातील डांभुर्णी या गावातील एका २७ वर्षीय तरुणी गावातील एका तरुणासोबत शेतीकामासाठी जवळच्या शेतात नियमित जात होती त्यामुळे तिची ओळख तरुणासोबत चांगलीच वाढली त्या तरुणाने तरुणीस पैशाचे खोटे आमिष दाखवून तरुणीस डांभुर्णी येथून सावदा येथे बोलवून त्यानंतर त्याच्या दुचाकी वर दिनांक १५ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास तिला दुचाकीने ओंकारेश्वर येथून बडवाह येथील एका लॉज मध्ये नेऊन त्या ठिकाणी तरुणीवर बळजबरी करीत तीच्या मनाविरुद्ध अत्याचार केला.या प्रकरणी दिनांक २२ जुलै रोजी तरुणाविरोधात यावल पोलिसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत.