यावल तालुक्यात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील अंजाळे गावातील मिनल निवृत्ती भागवत या विवाह ठरलेल्या तरूणीने आपल्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली.
अधिक माहीती अशी की , मिनल निवृत्ती भागवत वय २३ वर्ष या तरुणीने दिनांक १५ आक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९ :३० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील छ्ताच्या लोखंडी पाईपला ओढणीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे .मीनल चे लग्न जुळले होते व विवाह दिवाळी नंतर होणार होता अशी माहीती मिळत आहे. तरुणीने आत्मह्त्वा का केली असावी हे अद्याप समजू शकले नाही. या बाबत मयत तरूणीचे वडील निवृत्ती किसन भागवत वय ५८ वर्ष यांनी खबर दिल्याने यावल पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून मयत तरूणीचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रूग्णालयात करण्यात आले.