यावल पालिकेत एसीबीच्या कारवाईने टक्केवारीची पोलखोल : अनेक प्रकरण बाहेर येणार ?
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
फैजपूर, मंडे टू मंडे वृत्तसंकलंन| यावल नगरपालिका मुख्याधिकारी बबन तडवी यांना कंत्राटदाराकडून २ टक्के दराने २८ हजारांची लाच प्रकरणी एसीबी कडून काल करण्यात आलेल्या कारवाईने तालुक्यात व नगरपालिका वर्तुळात खळबळ उडाली असून कारवाईने राजकीय मंडलीचेही धाबे दणाणले असून राजकीय मंडळींच्या बाकीची टक्केवारी समोर येण्याची शक्यता असल्याची शहरात चर्चिली जात आहे. यात बाकी टक्केवारीच्या यादीची चर्चा सद्या शहरात चर्चेचा विषय झाला आहे.
संबधित मंडळी कंत्राटदारांनकडून कामे करून देण्यासाठी हजारो लाखो रुपयांची लाच घेतात हे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले असलेले तरी पालिकेतील यात सहभागी अदृश्य हात मात्र समोर आलेले नाही. मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यावर अनेकदा आरोप करण्यात आले होते व बर्याच प्रकरणांमध्ये चौकशी करून कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली होती. नगरपालिका अधिकारी व पदाधिकारी मंडळी कामांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल करण्याचे विषय दबक्या आवाजात ऐकायला येत होते. मात्र काल १४ लाख रुपयाच्या रस्ता बांधकामाची वर्क ऑर्डर देण्यासाठी २ टक्के दराने २८ हजार रुपयांची लाच प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांवर थेट लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने कारवाई केल्याने तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली आहे. या अटकेचा संबंध नगरपालिकेतील राजकीय वादाशी असल्याचेही सर्वत्र बोलले जात आहे.
एकंदरीत सदरील कारवाईने पालिकेच्या टक्केवारी भांडाफोड झाला असून बाकीच्या यादीची विषय मात्र आता ऐरणीवर आला आहे. येत्या ४-५ दिवसात साठवण तलावाच्या कामासाठी याच प्रकारे टक्केवारीचा होशोब जोडला होता त्यात ७ ते ८ लाखापर्यंत लाचेची आर्थिक उलाढाल पालिकेतील मंडळींकडून होणार होती, मात्र एसीबीच्या कारवाईने टक्केवारीची गणित बिघडली असून पंचाईतच झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. निकृष्ट प्रतीची कामे, कामांमधील गैरप्रकार, भ्रष्टाचार याबाबत वेळोवेळी तक्रारी प्राप्त होऊनही वेळेवर आणि तात्काळ कारवाया न झाल्यामुळे या सर्व प्रकारामुळे शहरातील नागरिक तीव्र संताप व्यक्त करत असून जळगाव जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी नगर परिषद विभाग यांनी तात्काळ लक्ष केंद्रित करून यावल नगरपालिकेतील भोंगळ कारभाराची चौकशी करून कडक कारवाई करावी असे शहरातील नागरिकांमध्ये सूर उमट आहे.