किनगाव येथे विहरित आढळला अज्ञात तरुणांचा कुजलेला मृतदेह !
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा : तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील गावशिवारात एका ३० वर्षीय अज्ञात तरुण व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह गावातील एका विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, किनगाव बुद्रुक तालुका यावल येथील लीलाधर खंबायत यांच्या गावशिवारातील विहरित एका अन्यात तरुणांचा मृतदेह अत्यंत कुजलेला अवस्थेत दिसून आल्याने नागरिकांनी पोलीस पाटील यांना यासंबंधीची कळवले यानंतर यावल पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली असता पोलीसानी लागलीच घटनास्थळी धाव घेत वहिरीतून मृतदेह काढत मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून १५ ते २० दिवसांपासून विहिरीत हा मृतदेह पडून असल्याचा अंदाज असून ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले आहे. याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.