भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

यावल तालुक्यात पुन्हा खून, महिलेच्या खुनाने तालुका हादरला

यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील चितोडा येथील तरूणाच्या हत्येमुळे उडालेली खळबळ अजून शांत होत नाही तोच पुन्हा एकदा महिलेच्या खुनाने यावल तालुका हादरला.

गेल्या काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील चितोडा येथील तरूणाचा खून झाला होता. या गुम्ह्यात एका महिलेसह तीन जणांना अटक करण्यात आली हे आरोपी पोलीस कोठडीत आहेत. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. आज पुन्हा यावल तालुक्यात खुन झाल्याने नागरिक दहशतीत सापडले आहेत .

आज सायंकाळी उशिरा शहरातील नाजीया जलील काझी, वय ३५, रा. काजीपुरा, या महिलेवर कुर्‍हाडीने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात ही महिला गतप्राण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शहरात ही खबर वार्‍यासारखी पसरताच परिसर हादरला आहे. यावल येथील ग्रामीण रूग्णालयात डॉ. पवन जैन यांनी तपासणी करून महिलेस मृत घोषीत केले आहे. एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!