भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

फैजपूर नगरपालिकेचा भोंगळ कारभार, पालिकेच्या जागेवर ” टू व्हीलर पार्किंग ” चा बोर्ड लाऊन वसुली

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l फैजपूर नगरपालिकेच्या जागेवर सार्वजनिक ठिकाणी जागेवर “टू व्हीलर पार्किंग” चा बोर्ड लाऊन फैजपुर शहरात तीन ठिकाणी यात्रेस येणाऱ्या यात्रिकरांकडून वीस रुपये प्रमाणे पैसे वसूल केल्याचा गोरखधंदा फैजपूर शहरात घडला.

अधिक माहिती अशी की, होळी निमित्त फैजपूर शहरात खंडेराव महाराजांची परिसरातील सर्वात मोठी यात्रा भरते, खंडेराव महाराज हे परिसरातील नव्हे तर राज्यातील बहुसंख्य लोकांचे कुलदैवत आहे , रावेर, यावल, भुसावळ परिसरातील नव्हे तर जळगाव जिल्ह्यातील नागरिक खंडेराव महाराजांच्या दर्शना निमित्त यात्रा बघायला येत असतात. दरवर्षी ही यात्रा तीन ते चार दिवस भरायची परंतु या वर्षी हीच यात्रा जवळ – जवळ सात ते आठ दिवस सुरू होती, या निमित्त ग्रामस्थांची, नागरिकांची मोठी गर्दी असते बाहेर गावाहून येणारे हजारो लोक मोटार सायकलीने येत असतात.

येथील नगरपालिकेच्या मालकीच्या सरदार वल्लभभाई मार्केटच्या बाहेर आवारात काही लोकांनी येथे गाडी लावण्यासाठी “टु व्हिलर पर्किग” चा बोर्ड लाऊन प्रत्येक टु व्हिलर वाल्या कडून प्रत्येकी वीस रूपये घेत होते. असा टेबल टाकून खुले आम पैसे वसूल करीत होते.या बाबत त्यांना विचारले असता त्यांनी या कॉम्प्ले्स मधील गाळे धारकानी आम्हाला रोजंदारीवर ठेवलेले आहे असे त्यांनी सांगितले. यांचे कडे नगरपालिकेची कुठलीही परवानगी नसल्याचे सांगितले गेले, खरच त्यांना सरदार वल्लभभाई पटेल कॉम्प्ले्स मधील गाळे धारकानी रोजंदारीवर ठेऊन पैसे वसूल करीत होते का? यात्रा जवळ जवळ सात ते आठ दिवस सुरू होती दररोज हजारो यात्रेकरू येथे. गाड्या लावत होते,इतक्या दिवसात किती रुपये वसूल केले गेले.

या बाबत नगरपालिका अनभिग्न होती का? पालिकेच्या कुठल्याही जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्याला या बाबत माहिती अथवा दिसले नाही का? यात कुठल्या कर्मचाऱ्याचे हितसंबंध तर नाही ना? नाही तर गप्प का? हा वसुलीचा प्रकार गेल्या चार- पाच वर्षांपासून सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या बाबत गेल्या वर्षी जबाबदार पदाधिकारी, अधिकारी यांचे कडे तोंडी तक्रारी सुद्धा केल्या होत्या असेही खुद्द सांगितले गेले.

या व्यतिरिक्त नगरपालिकेच्या दवाखाना आवारातील परिसरात व नगरपालिका शेजारील बागीच्या जवळ सार्वजनिक ठिकाणी ही हाच प्रकार खुले आमं नगरपालिकेच्या नाकाच्या टीच्चुवर सुरू होता. या ठिकाणी यात्रेकरुंजवळून सर्रास वीस -वीस रुपये जबरजस्ती घेतले गेले, खरोखरच कॉम्प्लेक्स मधील लोकांनी याना असे सांगितले होते का? ही वसुली करणारे कोण? झालेल्या प्रकाराची चौकशी व्हावी यात्रेकरू मोटारसायकल धारकांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!