क्राईमयावल

फैजपूर मध्ये एक कोटींचा गुटखा जप्त, कारवाईने परिसरात गुटख्याची मोठया तस्करीवर शिक्का मोर्तब !

फैजपूर,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। फैजपूर परिसरात गुटखा तस्करांवर सर्वात मोठी कारवाई फैजपूर पोलिसांनी केली असून सुमारे 83 लाखांचा दोन आयशर भरून गुटखा जप्त करण्यात आल्याने गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. फैजपूर परिसरात मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असून सदरील कारवाईने शिक्का मोर्तब केला आहे.

फैजपूर पोलिसांना बर्‍हाणपूरकडून फैजपूरकडे गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ यांनी कर्मचार्‍यांसह बुधवार, 10 रोजी पहाटे तीन वाजता सापळा रचला. आमोदा गावाजवळील हॉटेल कुंदनजवळ आयशर क्रमांक एम.एच.19 सी.वाय.9364 व एम.एच.19 सी.एक्स.0282 ह्या गाड्या आल्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्यात गुटखा असल्याने दोन्ही वाहने पोलिस ठाण्यात आणण्यात आली.

पंचांसमक्ष वाहनाचा पंचनामा केल्यानंतर वाहनातून राज्यात प्रतिबंधीत असलेली 83 लाख सहा हजार 800 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला तर 34 लाख रुपये किंमतीची दोन्ही वाहने मिळून एकूण एक कोटी 17 लाख सहा हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नक्की माल कोणाचा हा तपास पोलीस करत असून परिसरात मोठ्या प्रमाणावर गुटक्याची वाहतूक होत असल्याचे या कारवाईने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

या प्रकरणी ज्ञानेश्वर सुखलाल चौधरी (33, कोडगाव, ता. चाळीसगाव, ह.मु.शास्त्रीनगर, चाळीसगाव), जयेश सुभाष चांदेलकर (33, रामेश्वर कॉलनी, जळगाव), राकेश अशोक सोनार (29, रामेश्वर कॉलनी, जळगाव) व मंगेश सुनील पाटील (31, रामनगर, एमआयडीसी, जळगाव) या चौघांना अटक केली गाडी चालक मंगेश पाटील यास ताब्यात घेवून त्यालाही सहआरोपी करण्यात आले आहे हवालदार विकास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!