क्राईमयावल

वाढदिवसादिनी तलवारीने केक कापण्याचा व्हिडिओ वायरल : दोघांना अटक !

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा। तालुक्यातील कोळन्हावी येथील निलेश सोळुंके याने वाढदिवसानिमित्ताने तलवारीने केक कापल्याप्रकरणाचा व्हिडिओ वायरल झाल्याने त्याच्यासह सहकार्याविरुद्ध आर्मएक्ट अन्वये यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला

याबाबत मिळालेली माहिती अशी, तालुक्यातील कोळन्हावी येथील निलेश रमेश सोळुंके याचा वाढदिवसासाठी आणलेला केक मित्रांसमवेत तलवारीने कापण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांचे निदर्शनास आला त्यांनी शोध घेतला असता हे तरुण तालुक्यातील  कोळन्हावी येथील असल्याचे समजल्यावर  बुधवारी निलेश सोळुंकेसह त्याचा मित्र समाधान  तायडे यादोघा संशयित आरोपींना ताब्यात घेत अटक केली व तलवारही पोलिसांनी जप्त केली. सहाय्यक  फौजदार अजित शेख यांचे फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध आर्म एक्ट अन्वये यावल येथे गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास पोलीस करीत आहेत .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!