यावल परिसरातअवैध धंद्याना ऊत,अवैध धंदे बंद करण्याची भाजपा ची मागणी.
Monday To Monday NewsNetwork।
कोरपावली,ता.यावल (प्रतिनिधी)। तालुक्यात व यावल परिसरात अवैध धंद्याना ऊत आला असून पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष केले आहे, तात्काळ तालुक्यातील अवैध धंदे बंद न झाल्यास भारतीय जनता पक्षाचा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिलेल्या मुलाखातीत तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांनी सांगीतले की यावल शहरात व तालुक्यात सर्वत्र जुगारीचे अड्डे , अवैध दारूची विक्री व इतर सर्व प्रकारचे अवैध धंदे मोठया प्रमाणावर सुरू असुन , कोरोनाच्या नांवाखाली मात्र पोलीसांकडुन सर्वसामान्यांना त्रास देण्याचे प्रयत्न पोलीस यंत्रणेकडुन करण्यात येत असल्याचे भारतीय जनता पक्षाचे तालुका उमेश फेगडे यांनी सांगीतले असुन , तात्काळ तालुक्यातील ही सर्व अवैद्यधंदे बंद न झाल्यास आपण प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशा ईशाराही त्यांनी दिला आहे .
कोरपावली सह मोहराळा, हरिपुरा,दहिगाव ,सतोद ,वड्री, सावखेडा, विरावली सह,परिसरात अवैद्य धांदयना उत आला असून कोरोना काळात सम्पूर्ण लॉगडाऊन असताना या सट्टा पत्ता दारू यावर कुणाचे बंधन नाही का असा सवाल सर्व साधारण नागरिकांतून केला जात आहे,