भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

बामणोद येथील बेपत्ता तरुणांचा आढळला मृतदेह !

फैजपूर, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरापासून जवळच असलेल्या बामणोद येथील तरुण गेल्या मंडळावर आठ दिवसापासून बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल होती सदरील तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात फैजपूर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

अधिक माहिती अशी, यावल तालुक्यातील बामणोद येथून कैलास कडू सोनवणे ( वय-३४) हा तरूण गेल्या मंगळवार म्हणजे आठ दिवसांपासून बेपत्ता झाझाल्याची तक्रार पोलिसात नोंद करण्यात आली होती. दरम्यान, काल सोमवार रोजी बामणोद -पाडळसे रोडवर शेतात जाणाऱ्या शेतमजूर महिलांना मृतदेह दिसला याबाबत माहिती पोलिसात दिल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या कालव्यात हे शव वाहून आल्याने याबाबतची खात्री करण्यात आली यात कालव्यातुन मृतदेह बाहेर काढल्यानंतर ओळख पटल्याने सदरील मृतदेह कैलासचा असल्याचे स्पष्ट झाले. कैलासचा महिन्याभरापूर्वी पत्नीशी घटस्फोट झाला होता. या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!