भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

लाचखोर लेखापाल २० हजारांची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात

यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। २० हजारांची लाच घेताना यावलच्या आदिवासी प्रकल्प विभागातील लेखापाला जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली.यामुळे जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात व शासकीय विभागात मोठी खळबळ उडाली

तक्रारदार हे अमळनेर तालुक्यातील दहिवद येथील असून यांनी पत्नीच्या नावे असलेल्या मे.सप्तश्रृंगी माता आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था, दहिवद ता.अमळनेर जि.जळगाव या संस्थेच्या नावे आदिवासी मुलांचे वस्तीगृह (नविन) चोपडा ता.चोपडा या वस्तीगृहास सन-२०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात वस्तीगृहात लागणारे दैनंदीन भोजनाचा ठेका घेतलेला होता. त्यांनी वर्षभर सदर वस्तीगृहास पुरविलेल्या भोजन ठेक्याचा मोबदला म्हणून पत्नीच्या नावे असलेल्या संस्थेच्या बँक खात्यामध्ये एकुण ७३,००,०००/-रुपये डी.डी.द्वारे अदा करण्यात आलेले आहेत. सदर वर्षभराचे सर्व भोजन ठेक्याचा मोबदला म्हणून एकुण ७३,००,०००/-रुपये बँकेच्या माध्यमातून अदा करून दिल्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष आलोसे यांनी एकुण ७३,००,०००/- रुपये रकमेच्या अर्धा टक्का प्रमाणे प्रथम ३६,५००/-रुपये व नंतर तडजोडीअंती २०,०००/-रुपये लाचेची मागणी केली व सदर मागणी केलेली लाच रक्कम रविंद्र भाऊराव जोशी, वय-५७ वर्ष, लेखा अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल. ता.यावल जि.जळगाव. वर्ग-२ , रा.नेहरू नगर,मोहाडी रोड, जळगाव, ता.जि.जळगाव.यांनी एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल कार्यालयातील त्यांचे स्वतःचे कक्षात स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर यावल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना एसीबीने अटक केली .ही घटना आज शुक्रवारी दि- २६ मे रोजी घडली.

कारवाई पथकात शशिकांत पाटील,पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव. एन.एन.जाधव,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव. पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ. राकेश दुसाने. पो.कॉ.सचिन चाटे, PI.संजोगब च्छाव, ला.प्र. वि. जळगाव स.फौ.दिनेशसिंग पाटील,स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, म.पो.हे. कॉ.शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ. प्रदिप पोळ, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ. प्रणेश ठाकुर. यांचा समावेश होता.

.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!