यावल तालुक्यात एकाच गावात सहा ठिकाणी घरफोडी,ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Monday To Monday NewsNetwork।
यावल (प्रतिनिधी)। यावल तालुक्यातील किनगाव येथील आत्माराम नगरात सहा ठिकाणी घरफोडी झाल्याचे उघडकीला आले आहे. एकाच गावात सहा ठिकाणी घरफोडी झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, २१ मे च्या मध्यरात्रीच्या २ ते ३ वाजेच्या सुमारास आत्मारात नगरातील सहा घराच्या मागील बाजूस असलेल्या घरात घरातील सर्व मंडळी आपआपल्या घरात झोपेत असतांना अज्ञात चोरट्यांच्या टोळक्यांनी या घरांच्या मागील बाजूच्या खिडक्या तोडुन घरात प्रवेश करून चोऱ्या केल्या मात्र घरातून काय चोरी केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान एकाच गावात एकाच ठिकाणी ५ ते ६ घरफोडीची करण्याची ही पहीलीच घटना असून या मागे परप्रांतीय सराईत गुन्हेगारांची टोळी असावी का ?किंवा परिसरातीलच कोणी माहितगार असावे या बाबत वेगवेगळे संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घरफोडीच्या घटनेमुळे किनगाव व परिसरातील राहणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून यावल पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या आदेशाने पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार यांनी घटनास्थळी जावुन पंचनामा करून पुढील तपास करीत आहे.