भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्ययावल

साकळी प्रा.आ.केंद्रात अनागोंदी कारभार थांबता थांबेना ! रुग्णांची होते आहे फरफट, तपासणी न करता रुग्णांना औषधांचे वाटप

यावल, ता. यावल.मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दोघं पदे रिकामे असल्याने अनागोंदी कारभाराने सध्याच्या काळात कळस गाठलेला असून वरिष्ठांकडे तोंडी तक्रारी करूनही सदरचा कारभार थांबायचं नाव घेत नाही आहे. केंद्रात दुर्लक्षित व अनागोंदी कारभारामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची गंभीर बाब दिसून येत आहे. या ठिकाणी कोणतीही तपासणी न करता कर्मचाऱ्या कडून औषधांचे वाटप सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आलेला आहे.

एकूणच केंद्राच्या गलथान कारभारामुळे रुग्णांची फरपट सुरू असून अशा या कारभारामुळे एखादया आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो . अशी गंभीर परिस्थिती या केंद्रात निर्माण झालेली आहे. तरी सदर साकळी प्रा.आ.केंद्राचा कारभार सुधारण्यासाठी वरिष्ठ प्रशासन केव्हा लक्ष देणार ? हा मोठा प्रश्न आहे.

या पूर्वीही गेल्या जानेवारी महिन्यात खोकल्याच्या औषधाऐवजी साकळी येथील वृद्ध महिला रुग्णाला चक्क रक्तवाढीचे औषध दिले होते

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यावल तालुक्यातील साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोघं वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या तब्बल १२ जागा रिक्त आहे. तसेच येत्या काळात केंद्रातील अजून काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या असल्याने अजून काही जागा रिक्त होणार आहे त्यामुळे सदर केंद्राचा कारभार आता पुर्णतः बेभरोसे राहणार आहे. त्यामुळे केंद्रातील कोणताही कर्मचारी आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी केंद्रातील अति महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सुद्धा सांभाळत आहे. त्यात औषध निर्माता पद रिक्त असल्याने चक्क कोणताही कर्मचारी औषध वाटप करीत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहे. तर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पदे रिक्त असल्यामुळे परिसरातील उपकेंद्रातील सीएचओ सदर साकळी प्रा.आ.केंद्रातील दररोजची तपासणी(ओपीडी) करून आपली जबाबदारी कशीबशी पार पाडीत आहे. एकूणच या केंद्राच्या अश्या गलथान , वेळकाढू व बेरवश्याच्या कारभारामुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागलेला आहे.

या ठिकाणी वीस ते पंचवीस महिलासह रुग्ण तपासणी उभे होते.तसेच मनवेल येथील आश्रमशाळेचे शालेय विद्यार्थी सुद्धा आरोग्य तपासणीसाठी आलेले होते. मात्र या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून तपासणीसाठी असलेले सीएचओ अधिकारी सुद्धा हजर नसल्याने सर्वच रुग्ण दुपारपर्यंत ताटकळत बसलेले होते. तसेच केंद्रातील काही कर्मचारी कुठलीही तपासणी न करता चक्क औषधांचे वाटप करीत होते. हा धक्कादायक प्रकार पाहिल्या नंतर हा सर्व प्रकार चुकीचा आहे ही बाब साकळी ता.यावल येथील सामाजिक कार्यकर्ते मनु निळे यांनी दि.१९ रोजी केंद्रास अचानक भेट दिली असता उपस्थित कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिले त्यावर कोणताही कर्मचारी बोलायला तयार नव्हता. तेव्हा यांनी तात्काळ जिल्हा वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकिय अधिकारी तसेच साकळी केंद्राचा नुसता ‘ आर्थिक ‘ पदभार सांभाळणारे वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन या सर्व अधिकाऱ्यांकडे संपर्क करून सदर केंद्रातील गलथान कारभाराच्या बाबी लक्षात आणून दिल्या. साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रिक्त पदे व कारभाराबाबत राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनाही दूरध्वनी वरुन मनु निळे यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र मंत्री महोदयांशी संपर्क झाला नाही.

एकूणच सदर केंद्राच्या बेभरोशाच्या कारभाराकडे जिल्ह्यातील आरोग्य प्रशासन तसेच सर्वच लोकप्रतिनिधींनी गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे व केंद्राचे सर्वच प्रश्न तात्काळ मार्गी लागण्यासाठी तातडीने प्रयत्न करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनु निळे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना केलेली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!