फैजपूर शहराच्या नागरी समस्या वाऱ्यावर, नगरपालिका प्रशासनावर नागरिकांची तीव्र नाराजी
फैजपूर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। येथील पालिकेत गेल्या चार महिन्यांपासून मुख्याधिकाऱ्यांची बदली झाल्याने कायम मुख्याधिकारी नाहीत तसेच पाणीपुरवठा विभागाचे विभागप्रमुख यांची बदली झाल्यामुळे फैजपूर च्या नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या वाऱ्यावर असून गेल्या चार महिन्यापासून शहरात मुबलक पाणी असताना नियोजन शून्य कारभार सुरू असून तसेच साफसफाई वेळेवर होत नसून शहरातील अनेक भागातील पथदिवे बंद अवस्थेत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या चार महिन्यापासून येथील मुख्य अधिकारी वैभव लोंढे तसेच पाणीपुरवठा विभागाचे विभाग प्रमुख यांची बदली झाल्याने त्या जागा रिक्त आहेत फैजपूर नागरपालिकेत प्रशासकीय राज असून फैजपूर शहरातील नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे शहरातील नागरिक हे वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे नगर परिषदेत कोणीही अधिकारी जबाबदारी घेत नसून मुख्याधिकारी नाही उद्या येणार परवा येणार असे नागरिकांना उत्तरे दिले जात असल्यामुळे केवळ टोलवाटोलविची उत्तरे दिले जात आहे,
फैजपूर शहरातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेली असून गटारी,नाले साफसफाई होत नाही, शहरातील अनेक भागातील पथदिवे बंद पडलेले आहेत असे अनेक कामे नगर पालिकेकडून ठेकेदारांना दिलेले असून कोणतीही सुविधा नागरिकांना मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे मात्र या ठेकेदारांना नगर पालिकेकडून कामांची बिले मात्र त्वरित कसे दिले जात आहेत? असा असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झालेला आहे शहरातील नागरिक वेगवेगळ्या भागातून समस्या घेऊन येत आहे परंतु जे अधिकारी उपलब्ध आहे ते केवळ उडवा- उडवी उत्तरे देऊन नागरिकांना रवाना करण्याचे काम करीत आहे या गंभीर बाबीकडे वरिष्ठ मुख्य प्रशासक अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन दाखल घेण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे