फैजपूर ते तरसोद पायदळ वारी संपन्न
फैजपूर,ता.यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। फैजपूर ते शेगाव पायी वारी रविवार ३ डिसेंबर रोजी सुखरूप पणे संपन्न होऊन पार पडली त्या बद्दल जय गजानन गृप फैजपूर तर्फे फैजपूर ते तरसोद ही मावंद्यची पायी वारी १५० आबाल, वृद्ध, तरुण पदयात्रीसह वारी प्रमुख दीपक होले सर यांच्या प्रांगणातुन भक्तीमय व शिस्तबद्ध वातावरणात आचार्य महामंडलेश्वर सतपंथरत्न श्री जनार्दन हरिजि महाराज यांचे मार्गदर्शनानुसार संपन्न झाली.
ह्या वारीचे ३७ किमी अंतर वारकऱ्यांनी ८ तासात उत्साहाने पार केले. या पायदळ वारीला सर्व तरुण मित्रपरिवार याचे सहकार्य लाभले.रथाची व्यवस्था बबलू सोनवणे तसेच परतीच्या वाहनाची व्यवस्था संदीप होले यांनी केली. पिण्याच्या पाण्याची सेवा पिंटू भारंबे आणि मित्र परिवार यांनी पहिली.या वारीचे आयोजन दीपक होले सर,दिनकर नारखेडे, योगराज नारखेडे,गिरीश नेमाडे यांनी केलेले होते.