यावल येथे महागाई विरोधात काँग्रेसची सायकल रॅली
मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।
यावल (प्रतिनिधी)। घरगुती गॅस, पेट्रोल , डिझेलसह सर्वच जिवनावश्यक वस्तुच्या वाढलेल्या किमतीच्या निषेधार्थ आमदार शिरीष चौधरी माजी आमदार रमेश चौधरी जि प चे गटनेते प्रभाकर सोनवणे व प.स. गटनेते शेखर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातून सायकल मोर्चा काढण्यात आला.केन्द्रातील नरेन्द्र मोदी यांनी सात वर्षापुर्वी सत्ता मिळवण्यासाठी जनतेला दाखललेले अच्छे दिन चे स्वप्न हे बुरे दिन मध्ये रूपांतरित झाले असल्याने नागरीकांना जिवन जगणे कठीन झाले असल्याचे दिसून मत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी व्यक्त केले , रविवारी सकाळी अकरा वाजेला येथील जीन प्रेस पासून सायकल मॉल त्याची सुरुवात झाली.
तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने प्रेसींग सोसायटीच्या आवारातुन निघालेल्या या सायकल रॅल्लीचे नेतृत्व यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी , जेष्ठ माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी , जि. प. गटनेते तथा तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे ,पं. स. गटनेते तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य शेखर सोपान पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली बुरुज चौक, जुना भाजी बाजार चौक , मुख्य मुख्य रस्ता मार्गे येथील पंचायत समिती जवळ रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीत नगरसेवक मनोहर सोनवणे , नगरसेवक असलम शेख नबी, नगरसेवक समीर शेख मोमीन ,गुलाम रसुल हाजी गुलाम दस्तगीर ,इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील ,शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे , हाजी गफ्फार शाह, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, दहिगाव सरपंच अजय अडकमोल, बामणोद चे सरपंच राहुल विलास तायडे , ग्रामीण कॉंग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील पटेल , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मुक्तार तडवी, नईम शेख ,पुंडलीक बारी , अभय महाजन , कमेटीचे प्रदेश उमेश जावळे , वढोदे सरपंच संदीप सोनवणे ,युवक काँग्रेस इम्रान पहेलवान यांच्यासह आदी काँग्रेस कमेटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.