आसाराम नगरमधील गटारीत दुर्गंधीयुक्त पाणी साचून; पाच वेळा दिलेले अर्ज कचराकुंडीत, नागरिकांचा संताप !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल (सुरेश पाटील)। यावल शहरातील आसारामनगर मधील विकसित भागातील गटारीतील पाणी वाहून जाण्याची जागा नसल्याने गटारीत दुर्गंधीयुक्त पाणी साचून राहत असल्याने गटारातील पाणी वाहून जाण्याची तात्काळ व्यवस्था करावी याबाबत यावलनगर परिषदेकडे नागरिकांनी पाच वेळा विनंती अर्ज केले होते आणि आहे परंतु नगर परिषदेने ते पाचही अर्ज कचराकुंडीत टाकून नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने आसाराम नगर मधील नागरिकांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आसाराम नगर मधील नागरिकांनी दि.17मार्च 2021रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल यांच्याकडे तसेच यावल नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की दि.6/10/2020पासून आतापर्यंत एकूण पाच वेळा विनंती अर्ज केले असल्याचे नमूद करून आसाराम नगर मधे गट क्र.708 मधील गटारीचे बांधकाम आमदार निधीतून झाले आहे.परंतु नव्याने बांधण्यात आलेल्या गटारीतील घाणपाणी पुढे वाहून जाण्यासाठी मार्ग नसल्याने गटारी घाण पाण्याने भरलेल्या आहेत, तरी या गटारी तील पाणी कोणत्याही मार्गाने काढावे जेणेकरून गटारीत घाण पाणी थांबणार नाही परंतु त्यावर नगरपरिषदेने कोणतीही कार्यवाही केलेली नाही तसेच आम्ही रहिवासी नियमाप्रमाणे घरपट्टी,पाणीपट्टी व इतर सर्व कर वेळेच्या वेळी 20 वर्षापासून भरत आलेलो आहोत. परंतु नगरपालिकेकडून कोणत्याही सुविधा आज पावतो आम्हाला मिळालेल्या नाहीत.
गटारीतील घाण पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसल्याने आसाराम नगर मध्ये दुर्गंधी निर्माण झाली तसेच सदर साचलेल्या पाण्यात जंतू ,डास भरपूर प्रमाणात झालेले आहे. सध्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून नागरिकांचे आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे आपल्याशी बऱ्याचवेळा वेळा प्रत्यक्ष भेट घेऊन समस्या मांडली परंतु आपल्याकडून बघु–करु असेच उत्तर मिळाले यावरून असे निदर्शनास येत की आसाराम नगर मधील गट क्र.708 बद्दल आपण जाणून बुजून गटारीचे कामकाज पूर्ण करीत नाही तरी गटारीतील घाण पाणी वाहून जाण्यासाठी कोणत्याही मोठ्या गटारी जोडाव्यात अन्यथा दुसरी कोणतीही पर्यायी व्यवस्था करावी असे दिलेल्या तक्रार अर्जात आसाराम नगर मधील रहिवाशांनी म्हटलेले आहे या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव मुख्य अभियंता यांच्याकडे सुद्धा देण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.तरी यावल नगरपालिका आसाराम नगर मधील गटारी तील घाण पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करतील का ? किंवा गटारी जोडण्यासाठी यावल नगरपालिकेवर राजकीय किंवा लोकप्रतिनिधींचा दबाव आहे का? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.