इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करून मुलीची बदनामी, यावल तालुक्यातील प्रकार
यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एका तरूणाच्या नावाचा व फोटो चा वापर करून इंस्टाग्रामवर बनावट खाते तयार करून मुलीची समाजात बदनामी केल्याचा प्रकार यावल तालुक्यातील कोरपावली येथे घडला. हा प्रकार मंगळवारी सकाळी ११ वाजता उघडकीला आला आहे. याप्रकरणी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील कोरपावली गावातील एका शेतकरी तरूणाचा फोटो व नावाचा वापर करून अज्ञात व्यक्तीने इंस्टाग्रामवर बनावट खाते तयार केले. त्यावर तरूण शेतकऱ्याच्या मुलीच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान टाकून तिची बदनामी केली. हा प्रकार २३ सप्टेंबर रोजीपासून ते मंगळवारी १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता समोर आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरूण शेतकऱ्याने तातडीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो. नि. लिलाधार कानडे हे करीत आहेत.