अट्रावल येथे महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबना; तणाव पूर्ण शांतता!
यावल, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील अट्रावल येथे महापुरूषांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आलीय. सुमारे दहा-बारा जणांच्या जमावाने पहाटे सव्वासहा वाजेच्या सुमारास हा प्रकार केल्याची महिती मिळत आहे. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
मिळालेली माहिती अशी की,यावल तालुक्या सह सम्पूर्ण जळगाव जिल्ह्यात जागृत मुंजोबाचे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या यावल तालुक्यातील अट्रावल येथे सुमारे दहा-बारा जणांच्या जमावाने आज पहाटेच्या सुमारास महापुरूषांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून येथील पथदिवा फोडून नंतर पुतळ्याची तोडफोड केली.
हा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या जमावाने या ग्रामस्थांना मारहाण करत पलायन करण्यात यशस्वी झाले सदरील घटनेची वार्ता परिसरात पसरताच दोन गटांमध्ये दगडफेकीसह तुफान हाणामारी झाल्यानेगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अतिरिक्त कुमक मागविण्यात आल्याने लवकरच वातावरण नियंत्रणात आले.
गावात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून येथील वातावरण नियंत्रणात असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले असून कुणीही या प्रकरणाच्या बाबत अफवा पसरवू नये. सोशल मीडियात दिशाभूल करणारी माहिती प्रसारीत करू नये. आज अट्रावलमध्ये जो प्रकार घडला, त्यातील दोषींवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.