भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्ययावलसामाजिक

विरोदा गावात घाणीचे साम्राज्य, ‘ट्रॅक्टर तर आहे मात्र त्यामध्ये डिझेल नाही.’ व्यथा ग्रामपंचायतीची !

विरोदा.ता.यावल,मंडे टू मंडे न्युज. दिपक तायडे। यावल तालुक्यातील विरोदा गावामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे रहीवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावामध्ये चौकामध्ये ठेवण्यात आलेल्या कचराकुंड्या ह्या संपूर्ण फुल होवून कचरा कुंडीच्या आजू बाजूला कचर्‍याचे ढिग लागले असल्यामुळे त्यामधुन अती प्रमाणात दुर्गंधी येत आहे. त्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना याचा खुप मोठा त्रास होत असुन. तेथिल नागरिकांना आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ग्रामपंचायतीकडे स्वमालकीचे मिनी ट्रॅक्टर असुन सुद्धा याकडे दुर्लक्ष का? याची विचारणा ग्रामस्थांनी केली असता ग्रामपंचायतीने आश्चर्य वाटावे असे उत्तर देवून सर्वांना मौन धारण करण्यास भाग पाडले, ते म्हणजे ‘ट्रॅक्टर तर आहे मात्र त्यामध्ये डिझेल नाही’ व ‘ग्रामपंचायतीकडे डिझेलसाठी पैसा सुद्धा नाहीत.’ ग्रामस्थानी यावर उपाय काढत ग्रामपंचायतीला सांगितले की डिझेल आणायला पैसे आम्ही देतो मात्र आपण ही घाण त्वरित उचलण्याची व्यवस्था करावी. त्यावर सुद्धा ग्रामपंचायतीने भंन्नाट उत्तर दिले ते म्हणजे ‘ग्रामपंचायतीला फक्त एकच सफाई कर्मचारी आहे व त्याने हे काम पूर्ण होणे शक्य नाही व इतर सफाई कामगारांना बोलावून घेणे याचा सुद्धा खर्च ग्रामपंचायतीला परवडणार नसल्याचे त्यांनी सांगितले’ त्यामुळे गावातील नागरिक हताश होऊन काय करावे काय नाही या विचारात पडले आहे.

गावामध्ये दलीत वस्ती जवळील अंगणवाडी सुद्धा घाणीच्या विळख्यात सापडलेली आहे. ते असे की पुरषांसाठी सार्वजनिक स्वच्छालय असुन सुद्धा त्याचा वापर न करता अंधाराचा फायदा घेत अंगणवाडीच्या परिसरात उघड्यावर शौचाला बसत असल्यामुळे अंगणवाडीतील चिमुकल्यांना दुर्गंधी सह आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. अंगणवाडी सेविका यांनी सुद्धा याची तक्रार ग्रामपंचायतीला वेळोवेळी केल्यावर सुद्धा ग्रामपंचायतीने कुठलीही दखल घेतली नसल्याचे चित्र समोर आले. या अश्या समस्यामुळे संपूर्ण नागरिक नाराज असुन संबधीत विभागाने तरी समस्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!