भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

विरोदा येथे स्वस्त धान्य दुकानात लाभार्थ्याना “आनंदाचा शिधा” किट वाटपास सुरुवात

विरोदा,ता.यावल ,मंडे टू मंडे न्युज, दीपक तायडे। शासनाने राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाभार्थ्यांना दिवाळी सणानिमित्त नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रति शिधापत्रिका १ किलो रवा, १ किलो साखर, १ किलो चना डाळ आणि १ लिटर पामतेल या ४ शिधाजिन्नसांचा संच रु. १००/- मात्र या दराने वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्या नुसार यावल तालुक्यातील विरोदा या गावी स्वस्त धान्य दुकानात लाभार्थ्याना आनंदाचा शिधा किट वाटपास सुरुवात करण्यात आली असून त्या नुसार प्रति शिधापत्रिकास साखर अजून शासनाकडून पुरविली गेली नसल्याने १ किलो रवा, १ किलो चना डाळ आणि १ लिटर पामतेलाचा संच वाटप केला जात असून साखर नंतर दिली जाणार असल्याचे रेशन दुकानदाराने सांगितले. आनंदाचा शिधा किट वाटप करते वेळी स्वस्त धान्य दुकानदार फारुक अब्दुल्ला शेख..अमोल वारके, सागर तायडे, गोपाळ खाचणे, कविता चौधरी,नीता पाटील आदी उपस्थित होते

जळगाव जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या ६.२०,६५० शिधापत्रिकांसाठी दिवाळी शिधाजिन्नस संचाची मागणी शासनाकडे नोंदविणेत आली होती. या जिन्नसांचा पुरवठा रास्त भाव दुकानांमार्फत या शिधाजिन्नसांचे वाटप हे ई- पॉस मशिनव्दारे करण्याचे शासनाच्या सूचना आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!