१२ मंदिरांत वस्त्र संहिता लागू, महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या फैजपूर येथे झालेल्या मंदिर विश्वस्तांची बैठकीत निर्णय
फैजपूर,ता.यावल.मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। महर्षी व्यास नगरी यावल तालुक्याची द्वितीय तालुकास्तरीय मंदिर विश्वस्त बैठक फैजपूर येथील श्रीराम मंदिरात यशस्वीरीत्या संपन्न झाली. बैठकीचे आयोजन महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि श्रीराम मंदिराचे अध्यक्ष श्री. नरेंद्र नारखेडे यांनी केले होते. या बैठकीला १५ मंदिरांच्या ३५ विश्वस्तांनी उपस्थिती लावली. बैठकीला महाराष्ट्र मंदिर महासंघचे जळगाव प्रतिनिधी तसेच हिंदू जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर, समितीचे श्री. धीरज भोळे आणि वारकरी संप्रदायाचे श्री. प्रवीण महाराज यांनी संबोधित केले.
मंदिरात धर्माचे शिक्षण मिळावे यासाठी धार्मिक ग्रंथांचे वाचनालय सुरु करावे ! – श्री. जुवेकर
बैठकीला संबोधित करताना श्री. जुवेकर म्हणाले, आता गणेशोत्सव सुरु होईल; पण हा उत्सव कशाप्रकारे केल्यास त्याचा आपल्याला लाभ होईल याची दिशा मिळणे आवश्यक आहे. हिंदूंना धर्माचे शिक्षण मिळण्यासाठी आता मंदिरांनी पुढाकार घेणे आणि त्यासाठी मंदिरात धार्मिक ग्रंथांचे वाचनालय सुरु करणे आवश्यक आहे.”
बैठकीला आलेल्यापैकी १२ मंदिरांनी वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय घेतला तसेच २ मंदिरांनी वाचनालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक महिन्याला अशी बैठक घेण्याचे सर्वानी एकमताने निश्चित केले असून पुढील बैठक न्हावी येथे होणार आहे.