“बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी; पूज्य भिडे गुरुजी यांना सुरक्षा प्रदान करावी
- हिंदु जनजागृती समिती, यावल यांची मागणी
यावल,जिल्हा-जळगाव,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l बंगाल येथे तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत सातत्याने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले जात आहेत.गेली अनेक वर्षे बंगालमधील संदेशखली येथे हिंदु महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख यांना नुकतीच अटक करण्यात आली आहे. याची दखल राज्य पोलिसांनीही घेतलेली नाही. तेथे सामान्य हिंदु नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांचे रक्षण होईल अशी स्थिती नाही, त्यामुळे तेथे तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी,अशी मागणी यावल येथील नायब तहसिलदार विनंते साहेब यांना निवेदन देताना सागर लोहार,कमलेश शिर्के,सुधाकर धनगर,राहुल कोळी,चेतन भोईटे,स्वप्निल कराडे,जयेश फालक,सागर कोळी,सागर धनगर,यश कोळी, केशवानंद काटकर हे उपस्थित होते.
मुलींवर अत्याचार करणाऱ्या नगर जिल्ह्यातील विनियार्ड ब्लेसेड चर्चच्या पास्टरवर कठोर कारवाई करा !
सोनई, तालुका नेवासा जिल्हा नगर येथील विनियार्ड ब्लेसेड चर्चच्या पास्टर सुनील गंगावणे, पास्टर उत्तम वैरागर, पास्टर संजय वैरागर यांनी अल्पवयीन दोन मुलींना तिच्या आजीला झालेला आजार बरे करण्याचे औषध देतो असे सांगत त्यांना चर्च मध्ये बोलावून सतत लैंगिक अत्याचार केला. गावातील काही सजग युवकांनी याचे चित्रीकरण केल्याने हे दुष्कृत्य बाहेर आले. त्यामुळे या तीनही पास्टरवर कठोरात कठोर कारवाई करून यांच्या चर्चमध्ये अशी दुष्कृत्ये चालतात का ? याची चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली गेली.
ऋषितुल्य पूज्य भिडे गुरुजी यांच्यावर आक्रमण करणाऱ्यावर कारवाई करा !
नुकतेच मनमाड येथे पूज्य भिडे गुरुजी यांचे वाहन अडवून त्यावर काही समाजकंटकानी आक्रमण केले. त्यांवर कारवाई करण्यात यावी,तसेच त्यामागे कोणाचा कुटील हात आहे हे शोधून काढून त्यांनाही कारावासात डांबावे अन् पूज्य गुरुजींना सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.