वयोवृध्द महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
फैजपूर, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : यावल तालुक्यातील न्हावी येथील ७० वर्षीय वयोवृध्द महिलेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यावल तालुक्यातील न्हावी येथे सोमवारी २५ एप्रिल रोजी घरात कुणीही नसतांना निर्मलाबाई मुरलीधर पाटील रा. पाटील वाडा या ७० वर्षीय वयोवृध्द महिलेने दुपारी पंख्याला दोरीच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या केली. कुटुंबातील सदस्य बाहेरून घरी आल्यावर गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले.
दरम्यान, तातडीने त्यांनी यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महतेचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी फैजपूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.