आमोदा-भालोद रस्त्यावर काटेरी झुडपांचे अतिक्रमण,खराब रस्त्यामुळे शेतकरी व विद्यार्थी हैराण
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। यावल तालुक्यातील आमोदा -भालोद रस्त्याची अवस्था फारच दयनीय झाली असून दोन्ही साईडने रस्त्यावर काटेरी झाडांचे अतिक्रमण झाले असल्याने समोरून येणारा दिसत नाही त्यामुळे अपघात होण्याचा मोठा संभव आहे.
यावल तालुक्यातील आमोदा – भालोद हया मधल्या रस्त्याचा वापर शेतकरी केळी वाहतूक व दररोज शेतात जाण्यासाठी वापरतात तसेच भालोद येथील कॉलेजमध्ये आमोदा, पिंपरूड, विरोदा, वढोदा येथील भरपूर विद्यार्थी जाण्यासाठी देखील याच रस्त्याचा वापर करतात आमोद्याकडून रस्त्याला दोन किलोमीटर पर्यंत मोठमोठे खड्डे पडलेले असून ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.आमोदा व परिसरातील नागरिक या रस्त्याचा वापर यावल तालुका असल्यामुळे काही कामासाठी तालुक्याला जावे लागल्यास याच मार्गाचा वापर करतात तसेच भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अट्रावल येथील मुंजोबाच्या दर्शनाला सुद्धा याच रस्त्याचा वापर होतो त्यामुळे येथे छोटे-मोठे अपघात होत असतात तसेच वाहनाचे पण नुकसान होत असते
त्यामुळे संबंधित विभागाने या खराब रस्त्याची दखल घेत रस्ता लवकर दुरुस्त करावा तसेच रस्त्याच्या दोन्ही साईड वरील काटेरी झाडांचे अतिक्रमण लवकर काढावे असे आमोदा,भलोद ,पिंपरुड या परिसरातील नागरिकांची मागणी आहे