फैजपूर बनले अवैध गुटख्याचे केंद्र, ओमनी गाड्यांमधून परिसरात गुटख्याची तस्करी
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले यावल तालुक्यातील फैजपुर शहर हे सर्वत्र प्रसिद्ध आहे , पूर्वी स्वातंत्र्य पूर्व काळात फैजपूर मध्ये १९३६ मध्ये कांग्रेसचे अधिवेशन भरले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे सह मोठमोठया नेत्याचा येथे पवनस्पर्श झालेला आहे ,परंतु आता मात्र फैजपूर हे शहर राज्यात बंदी असलेला व आरोग्यास अपायकारक असलेला तंबाखूजन्य गुटखा तस्करीचे मोठे केंद्र बनले आहे.
महाराष्ट्रात विक्री व बाळगण्यास प्रतिबंध असलेला व मानवी जीवनास अपायकारक असलेला तंबाखूजन्य गुटख्याची फैजपूर शहरातून ओमनी गाड्यांमधून तस्करी केली जाते , गुटख्या मुळे कर्करोगा सारखे मोठमोठे आजार होत असताना फैजपूर व परिसरातील गावांमध्ये गुटख्याची ओमनी व्हॅन गाडीतून अवैधरित्या बिनधास्त विक्री सुरू आहे .शहरातील मिल्लत नगर परिसर व बाहेरपेठ परिसरातून लाल व पांढऱ्या ओमनी व्हॅनांद्वारे गुटखा परिसरातील खेडे गावांमध्ये व शहरात गुटखा पोहोच केला जातो. दररोज लाखो रुपयांची यात उलाढाल होत असते. राज्यात अवैध गुटखा मोठ्या प्रमाणावर येत असतो त्या पैकी बऱ्याच ठिकाणी लाखो रुपयांचा गुटखा पकडला जातो परंतु या ठिकाणी कारवाई का होत नाही?