बर्हाणपुर-अंकलेश्वर महामार्गावर यावल जवळ बस- दुचाकींचा भिषण अपघात, एक ठार तीन गंभीर
यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। बर्हाणपुर-अंकलेश्वर महामार्गावर यावल शहरापासून सुमारे दोन किलोमिटर अंतरावरील महाजन पेट्रोल पंपाजवळ एसटी व दुचाकींचा भिषण अपघात होऊन त्यात एक तरुण जागीच मरण पावला तर तिन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवदास चव्हाण यांनी उपचार करून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
बुर्हाणपुर-अंकलेश्वर राज्य महा मार्गावर आज दि.१२ जुन सोमवार रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास यावल डेपोची बस क्रमांक (एमएच १४ बिटी २१४४) ही यावल हुन वाहनचालक राजेन्द्र सोनवणे हे चाळीसगाव येथे घेऊन निघाले होते. त्यावेळी बस आणि दुचाकी क्र. (एम पी ०९ क्युटी ३९३९) या वाहनांचा भिषण अपघात झाला. यात दयाराम बारेला (वय १९, रा. जामुनझीरा ता. यावल) हा जागीच ठार झाला तर मांगीलाल कोशा बारेला (वय २८), सुनिता मांगीलाल बारेला (वय २५) आणी पिंकी बारेला (वय ३, सर्व रा. शिरवेल जवळ खापर,जामली (मध्य प्रदेश) हे गंभीर जखमी आहेत. यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.